नात्यांची व्याख्या करावी का?
प्रत्येक नात्याला नाव द्यावं?
उत्तर शोधायला गेला तर गुंतागुंतीचा आहे
शोध सुरु आहे....
खरंतर काही नात्यांना नाव देऊ नये असं वाटत
खूप तरल असतात भावना
सगळ्या व्याख्यांच्या पलीकडच्या ...
नात्यांना नाव देणं म्हणजे खरंतर बंधनात अडकवण
तू माझा मित्र आहेस, तू माझ्यासाठी मित्रापेक्षा जास्त आहेस....
कशासाठी हे सगळ...
जी गोष्ट अमूर्त आहे तिला का मूर्त स्वरूप देतो आपण
आपल्या भावनांना मूर्त स्वरूप देऊन किती मर्यादा घालतो आपण
'नात' हे देखील आपल्या अमूर्त भावनांना दिलेलं नावच झालं :)
विचारांच्या कक्षेत न बसणाऱ्या या भावना फक्त जगायच्या आहेत
कोणत्याही मूर्त स्वरुपाशिवाय...
-भक्ती
पाऊलखुणा
वाटेवर राहिलेल्या काही आर्त पाऊलखुणा....
Monday, September 13, 2010
अगदी मनातलं....
अनेकदा वाटलं सगळ्यांपासून दूर जाऊ
सगळ्यांच्या नजरांना झुगारून तुझ्या मिठीत विसावून जाऊ
अनेकदा वाटलं .... लोकांच्या या गर्दीतून दूर जाऊ
निसर्गात विलीन होऊ ...
अनेकदा मनाला वाटलं... स्वत:पासुनही दूर जावं
...मनाची घालमेल, अस्वस्थता दूर करत....
तुझ्या शांत डोळ्यात विसावून जावं...
एक सुंदर स्वप्न बनून...
नात्यांची व्याख्या करावी का?प्रत्येक नात्याला नाव द्यावं?
उत्तर शोधायला गेला तर गुंतागुंतीचा आहे
शोध सुरु आहे....
खरंतर काही नात्यांना नाव देऊ नये असं वाटत
खूप तरल असतात भावना
सगळ्या व्याख्यांच्या पलीकडच्या ...
नात्यांना नाव देणं म्हणजे खरंतर बंधनात अडकवण
तू माझा मित्र आहेस, तू माझ्यासाठी मित्रापेक्षा जास्त आहेस....
कशासाठी हे सगळ...
जी गोष्ट अमूर्त आहे तिला का मूर्त स्वरूप देतो आपण
आपल्या भावनांना मूर्त स्वरूप देऊन किती मर्यादा घालतो आपण
'नात' हे देखील आपल्या अमूर्त भावनांना दिलेलं नावच झालं :)
विचारांच्या कक्षेत न बसणाऱ्या या भावना फक्त जगायच्या आहेत
कोणत्याही मूर्त स्वरुपाशिवाय...
-भक्ती
Subscribe to:
Posts (Atom)